चंद्रपूर:- पांचशे वर्षांच्या लढ्यानंतर पुनर्प्रतिष्ठापित झालेल्या श्रीरामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाचे (श्री बालकरामाचे) आजच्या शुभ दिवशी सहकुटुंब दर्शन घेताना मनस्वी आनंद झाला. हिंदूंच्या पराक्रमाचे, भारतीय सांस्कृतिक पुनर्जागरणाचे आणि विश्वशक्तीचे प्रतीक असलेले हे मंदिर याची देही याची डोळा पाहता येणे हे आपल्या सगळ्यांचे सद्भाग्य आहे. असेच आम्हा सर्वांना भारत माता महाशक्ती विश्वगुरू झाल्याचे पाहण्याचे भाग्य लाभावे, अशी प्रार्थना श्रीरामाजवळ केली.
ना. मुनगंटीवारांनी सहपरिवारसह घेतले श्री. रामलल्लाचे दर्शन #chandrapur
शनिवार, फेब्रुवारी १०, २०२४
0