Top News

लोकसभा निवडणुकीचे सोशल मीडियावरील व्हायरल वेळापत्रक खरे की खोटे? #Chandrapur #Maharashtra #loksabha #viralpost


केंद्र सरकारच्या या पंचवार्षिकमधील (Loksabha Election) अखेरच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यामुळे आता लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सोशल मीडियावर खोटे वेळापत्रक व्हायरल होत आहे. हे वेळापत्रक खोटे आहे. निवडणूक आयोगाने असे कोणतेही वेळापत्रक जाहीर केले नसल्याचे आधार न्युज नेटवर्क ला निदर्शनास आले.

सोशल मीडियावर खोटे वेळापत्रक व्हायरल

काय आहे व्हायरल वेळापत्रक?

महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक असे यामध्ये म्हटले आहे. त्यात पहिला टप्पा -11 एप्रिल: (7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरोली, चंद्रपुर और यवतमाल-वाशिम, दूसरा टप्पा -18 एप्रिल: (10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर तीसरा टप्पा -23 एप्रिल: (14 लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले, चौथा टप्पा - 29 एप्रिल: (17 लोकसभा सीट): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- (Loksabha Election)मध्य और मुंबई दक्षिण, हे वेळापत्रक खोटे आहे. निवडणूक आयोगाने असे कोणतेही वेळापत्रक जाहीर केले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने