चंद्रपूर:- सखा बाप पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत असल्याची घटना भद्रावती शहरात उघडकीस आली. सतत तीन वर्षांपासून आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका (५५) वर्षीय नराधम बापास भद्रावती पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोज शुक्रवारला सकाळी आठ वाजता पोस्को कलम ४ अन्वये कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकाराने बाप व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना भद्रावती शहरात उघडकीस आली आहे.
भद्रावती शहरात राहणाऱ्या या आरोपीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहते. मात्र मुलगी ही बापाजवळ राहत होती. सदर बाप हा आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता.
या प्रकाराची माहिती सदर मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने सदर मुलीसह भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर आईच्या समक्ष मुलीने भद्रावती पोलिसात या घटनेची तक्रार केली. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.