Top News

चंद्रपूर काँग्रेसचे युवा नेते विनोद बुटले शिवसेनेत #chandrapur #Shivsena


चंद्रपूर:- चंद्रपुरातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे युवा नेते विनोद बुटले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांना आता शिवसेनेच्या शिंदे गटाने गळाला लावले आहे. विनोद बुटले यांना पक्षाने युवासेना प्रमुख पद दिलं आहे. शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नुकताच त्यांचा पक्षप्रवेश करत त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
विनोद बुटले यांनी तत्कालीन खासदार नरेश पुगलिया यांच्यापासून तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पक्षासाठी काम केलेले आहे, पण गेल्या काही दिवसांपासून ते पक्षीय धोरणावर नाराज होते. पक्षातील स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीमुळे त्रस्त होऊन त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

दरम्यान, यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटात त्यांनी प्रवेश घेतला. या वेळी डॉ. श्रीकांत शिंदे, किरण पांडव, शुभम नवले, हर्षद शिंदे, प्रतिमा ठाकूर, नितीन मत्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत बुटले यांना चंद्रपूर जिल्हा युवासेना प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने