चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात बरांज या गावचे पुनवर्सन अद्याप झालेले नाही. दुसरीकडे प्रशासनाची कुठलीही परवानगी नसताना कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) या कोळसा कंपनीने कोळसा उत्पादनाचे काम सुरू केले आहे. याला संपूर्ण गावातून विरोध केला जात आहे.
कंपनीच्याविरोधात मागील 55 दिवसांपासून महिलांचे उपोषण सुरू आहे. मात्र, या उपोषणाकडे अद्यापही प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. कारवाई करण्याबाबत ठोस पाऊल उचलले गेले नसल्यामुळे आंदोलनकर्त्या महिला संतप्त झाल्या आहेत. या महिलांनी कोळसा खाणीच्या खड्डयात उतरून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. जवळपास दोन महिने आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने डोळेझाक चालवल्याने महिलांनी शेवटी हे पाऊल उचलले.