"त्या" नगराध्यक्षाचा वॉर्ड बनला समस्याचे माहेरघर! #Chandrapur #konpana #gadchandur

Bhairav Diwase
पाणी प्रश्न पेटला; रिकाम्या घागरी घेऊन महिलांनी थेट नगरपरिषद गाठले

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना 
कोरपना:- कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथील वार्ड क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 1, संत गाडगेबाबा नगर {झोपडपट्टी भाग} येथे ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटला असून संतप्त महिलांनी पाण्यासाठी रिकाम्या घागरी घेऊन थेट नगरपरिषद गाठले.

अनेक वर्षापासून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून एक सरकारी बोअरवेल असल्याने मोठी गर्दी होते आणि वेळप्रसंगी झगडे-भांडण सुद्धा होताता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नळाची नवीन पाईप लाईन टाकून पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी रहिवासीयांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

वास्तविक पाहता सदर प्रभागात 3 नगरसेवक आहे. नगरपरिषद नगराध्यक्षा स्वतः याठिकाणी राहतात. तसेच सत्ताधारी व विरोधी, असे 2 नगरसेवक सुद्धा याच वॉर्डात वास्तव्यास आहे. येत्या काही महिन्यात यांचा कार्यकाळ संपणार आहे. असे असले तरी ही मंडळी मागील 4 वर्षात स्वतःच्या प्रभागातील समस्या मार्गी लावण्यास सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या सदर प्रभागात नागरिकांना साधा पाणी उपलब्ध नाही ही शोकांतिका असून 'नागरिक बोंबलत आहे. असे पहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे नगरपरिषदेत हल्ली सत्ताधारी कोण? आणि विरोधी कोण? हेच समजणे कठिण होऊन बसले आहे.

प्रभारी मुख्याधिकारी लाभल्याने साहेब कधी येतात आणि कधी जातात? याचा थांगपत्ताही लागत नाही असे एकना अनेक रोषयुक्त प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसतात. कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही धाक नसल्याने याठिकाणी अक्षरशः राम भरोसे कामकाज सुरू असल्याचे आरोप सुद्धा होत आहे.

दरम्यान भीषण पाणी टंचाईचा सामना करीत असलेल्या गाडगेबाबा नगरातील संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन नगरपरिषदेचे कितीही उंबरठे झिजवले तरीपण समस्या मार्गी लागेल याची शाश्वती कमीच? कारण, ''आग लागे बस्ती मे, हम तो हमारे मस्ती मे" अशी परिस्थिती याठिकाणी होउन बसली आहे. एका बोअरवेलवर भागत नसल्याने नळाची नवीन पाईप लाईन टाकली तर समस्या मार्गी लागू शकते अशी मागणी जवळपास 45 च्यावर नागरिकांनी निवेदनातून केली असून नगरपरिषद शासन-प्रशासन यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याची समस्या मार्गी लावणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अन्यथा येणाऱ्या विविध निवडणुकीत वार्डवासी जाब विचारणार हे मात्र नक्की.