चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील सरदार पटेल महाविद्यालयात बुधवारी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चंद्रदेव खैरवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय ई. सोमकुवर, डॉ. कुलदीप आर. गोंड, कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके, प्रा. विकी पेटकर तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांबाबत आदरांजली वाहत महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगितले.दरम्यान कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा दिल्या. दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सदस्य आ. किशोर जोरगेवार, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, संदीप गड्डमवार, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.