चंद्रपूर:- १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. दरवर्षी १ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. १ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून सुद्धा ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलने करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे चंद्रपूरात भव्य मिरवणूक दि. ०१ मे सायंकाळी ५.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गिरनार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, कस्तुरबा चौक, आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर येथे पोहचल्यावर सांगता झाली. या मिरवणुकीत महाराष्ट्रप्रेमी तथा जेष्ठ नागरिक या भव्य मिरवणूकीत सामील झाले होते.
यावेळी जगदंब ढोल ताशा पथक चंद्रपूर, डिजे पथक, पारंपरिक आदिवासी नृत्य, मिरवणुकीत होते. मिरवणुकीत तरुणाईचा जल्लोष व उत्साह दिसून आला. डिजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. या भव्य मिरवणूकीचे आयोजन मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते.