अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं! #Jalana #policebharati

Bhairav Diwase
भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव
जालना:- जालना जिल्ह्यातून (Jalna News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जालन्यात पोलीस भरती अकॅडमीत प्रशिक्षण घेत असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आकाश इटकर असे मृत तरुणाचे नाव आहे.

तो हिंगोली जिल्ह्यातील शेनगावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. 12 दिवस आधीच तो अधिकारी होण्यासाठी जालन्यातील श्री करियर अकॅडमीमध्ये भरती झाला होता.

काय घडले नेमके?

सकाळच्या वेळेला ग्राऊंडवर प्रॅक्टीस करत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, पोलिसांकडून पंचनामा सुरु असून शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या तरुण मुलाच्या अश्या दुर्दैवी मृत्यूने आकाशच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.