अवकाळी पावसामुळे पडलेल्या कृषीपंपाच्या पोल व डिपीची दुरस्ती करा #korpana

Bhairav Diwase
भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची उपकार्यकारी अभियंता यांना मागणी

कोरपना:- कोरपना तालुक्यातील अवकाळी पावसामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या पोल तुटून पडलेले आहेत तसेच अनेक शेतातील डिपीसुद्धा खराब झालेल्या आहेत त्यामुळे सदर तुटून पडलेले पोल व खराब झालेल्या डीपी यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष साधने यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नितीन ढोकणे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.
तालुक्यात काही दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला होता त्यामुळे कोरपणा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पोल व डीपी खराब झालेले आहेत तसेच येत्या काही दिवसांनी खरीप हंगाम सुरू होणार आहेत तसेच पावसाळ्याला सुद्धा सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने पावसाळ्याच्या पूर्वी शेतातील तुटून पडलेले पूल व खराब झालेल्या डीपी यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात गेली आहे सदर पोल व डीपी ची दुरुस्ती न झाल्यास तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित राहू शकतात त्यामुळे सदर घटनेची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी गडचांदूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नितीन ढोकणे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देऊन उचित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.