नागपूर:- महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मतमोजणी चार जूनला होणार आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोणाला लागणार, हे 4 जूनलाच कळेल. मात्र, उमेदवारांचे समर्थकांमध्ये कोण जिंकणार याच्या पैजा लागत आहेत.
गावातील पारापारावर निकालाच्या अंदाजाबाबत चर्चा झडत आहेत. मात्र, विदर्भातील रामटेक मतदारसंघात कोण जिंकणार यावरून नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात पारावर होणाऱ्याचे चर्चेचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणात एका तरुणाला आपला जीव गमावावा लागला.
रामटेक मतदारसंघात Ramtek Lok Sabha शिवसेना (शिंदे गट) राजू पारवे यांच्या विरोधात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी लढत होत आहेत. या दोघांपैकी कोण जिंकणार याची चर्चा सिंगारखेडा गावातील पारावर सुरु होती. मात्र, या चर्चेत वादाची ठिणगी पडली आणि हाणामारी झाली. या मारहाणीत सतीश फुले या तरुणाला मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी प्रवीण बारडे याला अटक केली आहे.
रामटेक मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध काँग्रेसची लढत होत आहे. काँग्रेसने श्यामकुमार बर्वे निवडणूक रिंगणात होते. शिंदे गटासोबत भाजपने देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे रामटेक मतदारसंघाची विदर्भात मोठी चर्चा आहे.