चंद्रपूर:- चंद्रपूर मधून अपक्ष निवडून आलेले विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी काल सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश घेतला. जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाच्या समाजाची सेवा करण्याच्या मिशनला गती येईल आणि भाजपा चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभाच्या जागा प्रचंड मताधिक्याने जिंकून येईल असा विश्वास महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
काल पक्षप्रवेशानंतर आज किशोर जोरगेवार यांची भाजपतर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून किशोर जोरगेवार यांनी आज चंद्रपूरात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.