Sachin Bhoyar: मनसेकडून सचिन भोयर उद्याला दाखल करणार नामांकन अर्ज!

Bhairav Diwase
राजुरा:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघात मनसेने सचिन भोयर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. दिनांक 29/10/2024 रोज मंगळवार सकाळी 10 वाजता सचिन बापूराव भोयर राजुरा विधानसभा निवडणुक 2024 करीता उमेदवारी अर्ज/ नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहे.

 उद्याला संविधान चौक ते राजुरा तहसील कार्यालय पर्यंत शक्ती प्रदर्शन करी नामांकन अर्ज दाखल करणार आहे. नामांकन अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून माझे मनोधैर्य वाढवावे असे आवाहन मनसेचे उमेदवार सचिन भोयर यांनी केले आहे.