बल्लारपूर:- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून कॉंगेसकडून संतोष रावत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस मध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी अधिकृत प्रवेश केला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र डॉ. अभिलाषा गावतुरेंना डावलून महाविकास आघाडीने संतोष रावत यांना अधिकृत उमेदवारी दिल्याने डॉ. अभिलाषा गावतुरे आता अपक्ष लढणार असून ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे. मात्र नामांकन केला भरणार याची अधिकृत तारीख आलेली नाही. शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे हे सुध्दा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहे.
Dr. Abhilasha Gaoture: डॉ. अभिलाषा गावतुरे अपक्ष निवडणूक लढणार!
सोमवार, ऑक्टोबर २८, २०२४