List of Shiv Sena Thackeray group candidates announced: शिवसेना ठाकरे गटाच्या 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Bhairav Diwase

मुंबई:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यात 65 जणांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरू होता. परंतु आता हा वाद निवळला असून शिवसेना ठाकरेंच्या वतीने आज पहिली यादी जाहीर करण्यात आली.