मुंबई:- महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली दुसरी उमेदवार यादी आज (शनिवार, 26 ऑक्टोबर) जाहीर केली. या यादीमध्ये अनुक्रमे 15 आणि 23 जणांचा समावेश आहे. मविआ आणि महायुती यांच्यात सुरुवातीपासूनच जागावाटपाच्या मुद्द्यावरुन खेचाखेची सुरु आहे. ज्याचा परिणाम उमेदवार यादी जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबात झाला आहे. असे असले तरी दोन्ही आघाड्यांतील घटक पक्षांनी वादग्रस्त किंवा तोडगा निघू न शकलेल्या जागांचा अपवाद वगळता आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी उमेदवार यादी
शिवडी: अजय चौधरी, धुळे शहर: अनिल गोटे, चोपडा: राजू तडवी, जळगाव शहर: जयश्री सुनील महाजन, बुलढाणा: जयश्री शेळके, दिग्रस: पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली: रुपाली राजेश पाटील, परतूर: आसाराम बोराडे, देवळाली: योगेश घोलप, कल्याण पश्चिम: सचिन बासरे, कल्याण पूर्व: धनंजय बोडारे, वडाळा: श्रद्धा श्रीधर जाधव, भायखळा: मनोज जामसुतकर, श्रीगोंदा: अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली: संदेश भास्कर पारकर
काँग्रेस पक्षाची दुसरी उमेदवार यादी
भुसावळ: राजेश मानवतकर, जळगाव (जामोद): स्वाती वाकेकर, अकोट: महेश गांगणे, वर्धा: शेखर शेंडे, सावनेर: अनुजा सुनील केदार, नागपूर दक्षिण: गिरीश पांडव, कामठी: सुरेश भोयर, भंडारा: पूजा ठावकर, अर्जुनी-मोरगाव: दलिप बनसोड, आमगाव: राजकुमार पुरम, राळेगाव: वसंत पुरके, यवतमाळ: अनिल (बाळासाहेब) मंगुळकर, आर्णी: जितेंद्र मोघे, उमरखेड: साहेबराव कांबळे, जालना: कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व: मधुकर देशमुख, वसई: विजय पाटील, कांदिवली पूर्व: काळू बढेलिया, चारकोप: यशवंत सिंग सायन, कोळीवाडा: गणेश कुमार यादव, श्रीरामपूर: हेमंत ओगळे, निलंगा: अभयकुमार साळुंखे, शिरोळ: गणपतराव पाटील