बल्लारपूर:- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटला असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांना नुकतीच उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दि. 29 ऑक्टोबर रोजी ते आपला नामांकन अर्ज दाखल करतील. तशा आशयाचे पोस्टर देखील समाज माध्यमावर फिरत आहेत. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
संदीप गिऱ्हे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि पक्षाने तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे मी 29 ऑक्टोबरला नामांकन अर्ज दाखल करणार. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघील शिवसैनिक फटाके फोडत आनंद साजरा करित आहे.