Rajura Assembly Elections: राजुरामधून सुदर्शन निमकर आणि संजय धोटेंचा अर्ज मागे

Bhairav Diwase
राजुरा:- 70 राजुरा विधानसभा क्षेत्र महायुतीला बंड रोखण्यात यश आले आहे. भाजपाचे माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंड केला होता. मात्र दिनांक 4 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार अखेर माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार देवराव भोंगळे यांना दिलासा मिळाला आहे.