रामपूरच्या त्या आग पीडित कुटुंबाला मनसेची मदत.
महाराष्ट्र दिन सामाजिक बांधिलकी जपत साजरा.
राजुरा.. येथील शहराला लागून असलेल्या रामपूर गावात छत्तीसगडी मजुरांच्या झोपडीला आग लागली.यात जीवनावश्यक वस्तू सह रोख रक्कम जळून खाक झाल्याने तीन कुटुंब उघड्यावर पडले.त्या आग पीडित कुटुंबाला मनसेचे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांनी मदत केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...छत्तीसगड राज्यातील मजूर रोजगारासाठी रामपूरला आले आहे.ते खुल्या जागेत झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहे.मागील आठवड्यात लालदुरम निषाद,दुलारू निषाद व शाबिलाल निषाद हे कुटुंबा सह कामावर गेले असताना अचानक त्यांच्या झोपडी आग लागली.या आगीत भांडे,कपडे व जीवनावश्यक वस्तू सह रोख रक्कम जळून खाक झाली.त्यामुळे तिन्ही कुटुंब उघड्यावर पडले. ....ही तिन्ही कुटुंब मागील काही दिवसांपासून कसेबसे जीवन जगत होते.स्थानिक प्रशासनाने पंचनामा केला मात्र अजूनपावतो त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. आगीत तीन कुटंब उघड्यावर पडल्याची माहिती मनसे तालुका अध्यक्ष आदित्य भाके यांना मिळताच त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली व स्वयंपाकाला आवश्यक साहित्यासह धान्य देऊन मदतीचा हात पुढे केला.त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्या तिन्ही कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.यावेळी किट्टू मेडपल्लीवर,रोहित बत्तशंकर,संजय रामटेके,ओंकार आस्वले सह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.