माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे निधन

Bhairav Diwase

नागपूर:- गेल्या काही दिवसांपासून चेन्नई येथील हॉस्पिटल ला उपचार घेत असलेले भाजप नेते माजी प्रदेश महामंत्री व पश्चिम विदर्भ संघटन मंत्री तसेच विद्यार्थी परिषद चे प्रदीर्घ कामात राहिलेले डॉ रामदास आंबटकर यांचे आज चेन्नई येथील हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान दुखःद निधन झाले. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपूर येथे आज रात्री उशिरा पर्यंत येण्याची शक्यता असून, अंत्यविधी नागपूर किंवा त्यांचे मूळ गावी वडनेर येथे करण्यात येईल.

संघटना, कार्यकर्ता, माणूस व विचारा साठी झटणारा, यासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचणाऱ्या उत्तम कार्यकर्ता ओळख असलेले माननीय डॉक्टर रामदासजी आंबटकर यांचं आज दुपारी 12 वाजून 27 मिनिटांनी महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटरला चेन्नई येथे दुःखद निधन झाले.
अनेक दिवसांपासून डॉक्टर रामदास हे त्यांच्या किडनी संबंधित उपचारासाठी एमजीएम हेल्थकेअरला चेन्नई येथे उपचार घेत होते. पण यादरम्यान त्यांचेशी बोलता आले नाही याचे दुःख सदासर्व काळ राहील.

संघटनेसाठी आणि चळवळीसाठी चा एक मोठा आधार म्हणून रामदासजी होते त्यांच्या निधनाने राष्ट्रीय विचारांच्या चळवळीतला एक उत्तम कार्यकर्ता निघून गेला आहे त्यांच्या स्मृतीस मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.