चंद्रपूर:- चंद्रपूरच्या अपर पोलीस अधीक्षक (ASP) पदावर कार्यरत असलेल्या रीना जनबंधु यांची आता नागपूर येथे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे.
रीना जनबंधु यांनी चंद्रपूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. आता त्यांना नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांच्या जागी आता ईश्वर कातकडे हे चंद्रपूरचे नवे अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ईश्वर कातकडे सध्या भंडारा जिल्ह्यात अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्याला मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात नवीन ऊर्जा येईल आणि गुन्हेगारी नियंत्रणात अधिक यश मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.