Chandrapur News: आदिवासी संस्कृतीचा संगम: चंद्रपुरात तीन दिवसीय नाट्य महोत्सव

Bhairav Diwase

चंद्रपूर:- बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी च्या निमित्ताने चंद्रपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नाट्य महोत्सवाचे आयोजन होत असून, दिनांक 19, 20 व 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात हा महोत्सव सायंकाळी सहा वाजता सुरु होणार आहे. मराठा चारिटेबल ट्रस्ट, लोकजागृती नाट्य संस्था व स्वर्गीय माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त वि‌द्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या नाट्य महोत्सवाचे उद्‌घाटन चंद्रपूर-वणी-आणी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय पनिभालाई धानोरकर याच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्ह्याचे खासदार डॉ. नामदेव किरसान राहणार आहेत, या प्रसंगी प्राध्यापक वसंत पुरके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जमाली काँग्रेस तथा माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य राम चव्हाण, प्रा. डॉ. इसादास भड़के, डॉ. अनिल हिरेखन (कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ), डॉ. दिलीप चौधरी (सिनेट सदस्य), अश्विनी खोब्रागडे अध्यक्ष बॅंरिस्टर राजाभाऊ विचार मंच, कॉमेड नामदेव कन्नाके, प्रमोद बोरीकर, प्राचार्य के. आत्माराम, ज्येष्ठ लेखक चुडाराम बल्हारपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सुरुवातीचा प्रयोग:

महोत्सवाचा पहिला दिवस 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता लोकजागृती नाट्य संस्था, चंद्रपूर प्रस्तुत व दिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी सादर केलेल्या "धरती आबा बिरसा मुंडा" या भव्य नाट्यप्रयोगाने होणार आहे. या नाटकात 35 ते 40 कलाकारांचा सहभाग आहे.

दुसरा दिवस :

20 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता "गोंडवानाचा महायोद्धा वीर बाबुराव शेडमाके" या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. या नाटकाचे लेखन चुडाराम बल्हारपुरे यांनी केले असून दिग्दर्शन डॉ. अनिरुद्ध वनकर यांचे आहे.

तिसरा दिवस :

21 सप्टेंबर रोजी सकाळी 'प्रजासताकचे प्रहरी" या ग्रंथाचे प्रकाशन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित होणार आहे. संध्याकाळी 8 वाजता लोकजागृती नाट्य संस्थेची बहुचर्चित नाट्‌यकृती 'पायाळ पाखरा वा नाटकाचा 577 वा प्रयोग होणार आहे. या नाटकाने देशभरात आदिवासी जीवनावर प्रकाश टाकला असून दिल्ली, मुंबईपासून मणिपूर, आसामपर्यंत गाजला आहे.

या तीन दिवसीय नाट्य महोत्सवात शंभर ते दीडशे कलाकारांचा सहभाग असणार असून यामध्ये सिने कलावंत भारतरंगारी, रवींद्र धकाते, संजीव रामटेके, प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे, पाचव्या झाडीप‌ट्टी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष के आत्माराम, शुभांगी राऊत, रुपाली खोबागडे, नगना खोब्रागडे, कुमारी रासेकर, मंगेश मेश्राम, प्रवीण भसारकर, प्रमोद दुर्गे, अखिल भसारकर, निखिल मानकर, तीराणीक सर, प्राध्यापक राजकुमार मुसने, शेषराव जिभकाटे, गौतम डेंगळे, जुगल गणवीर, महेंद्र मेश्राम, बाबुराव जुमनाके, महेद्र गोंडाणे, डॉक्टर संगीता टेकाडे, हरेन्द्र रामटेके, अनिल डोंगरे, के. ईश्वर, लोकेश दुर्गे, विपिन राऊत, अंकुश शेडमाके, प्रियंका सिडाम, वैभव अंगरे, कुमार नखाते, स्नेहल वाड़गुरे, प्रमोद दुर्गे, विजय गुरुनुले, अशा अनेक कलावंतांची भूमिका करणार असून, शंभर ते दीडशे कलावंत सहभागी होणार आहेत, माजी मंत्री, आमदार, साहित्यिक व कलावंत उपस्थित राहणार आहेत. नाट्य महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिरुद्ध वनकर (संयोजक व महोत्सव दिग्दर्शक), गोपालभाऊ अमृतकर, प्रफुल पुलगमकर, गुंजत येरणे, भारत रंगारी, डॉ. इसादास भडके, अनुताई दहेगावकर, लीलाधर वाकडे, बाळू आंबेकर आदी कार्यकत्यांनी पुढाकार घेतला आहे.

हे नाट्य महोत्सव सर्व रसिकांसाठी निशुल्क असून, प्रेक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून आदिवासी नाट्य संस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजक व महोत्सव दिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी कळविले आहे.