कोरपना:- तालुक्यातील मौजा नारंडा येथे दालमिया भारत फाउंडेशनच्या ग्राम परिवर्तन उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वितरण राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून गरजू महिलांना रेशनकिटचे सुद्धा वितरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी आमदार देवराव भोंगळे यांनी संवाद साधला. दालमियाच्या या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा आहे.
आपल्या लोककल्याणकारी शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध कृषि योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली असून कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अधिक सुलभ होते आहे. या पुढच्या काळातही आपले केंद्र व राज्य सरकार विविध उपक्रमांतून शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचेही मत यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले व्यक्त केले. यावेळी नारंडा,लोणी,पिंपरी अंतरगाव बू सांगोडा येथील शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वितरण करण्यात आले.
यावेळी दालमिया सिमेंट कंपनीचे (HR) युनिट हेड अरविंद बोऊरा, मलाई स्वामी, प्रशांत भिमनकर, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, सरपंचा सौ. अनुताई ताजने, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, सीएसआर प्रमुख प्रशांत भिमनवार,विकास भडके, निखिल करमनकर, स्नेहा उपग्न्लावार,कवठाळा सरपंच रूपाली बोबडे,ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ,नारंडा उपसरपंच बाळा पावडे, पोलिस पाटील नरेश पाटील परसूटकर, आदर्श किसन विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुमुखी सर, मंगेश माडुरवार सर, नारंडा बूथ प्रमुख प्रवीण हेपट, नारंडा ग्रामपंचायत सदस्य तथा बुथ प्रमुख अनिल शेंडे,रंजना शेंडे,रुपाली उरकुडे,वर्षा उपासे,नागोबा पाटील उरकुडे, मारोती शेंडे, मारोती बोबडे,अरविंद खाडे,सूर्यभान सोनपितरे,संदीप गंगमवार,प्रशांत पंदीलवार,संतोष पावडे,संतोष वांढरे, प्रमोद शेंडे,हर्षल चामाटे, आशिष ढुमणे,भिकाजी घुगुल,रामचंद्र आगलावे,सचिन भोंगळे,संकेत गाडगे, मंगल खाडे,बाळा गाडगेरजत रणदिवे,सुरेश मुद्दलवार यांचेसह गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हेपट व आभार प्रदर्शन अरविंद खाडे यांनी केले.