नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी रडारवर
पोंभुर्णा:- नगर पंचायतीच्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घनकचरा व्यवस्थापन घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. नगर पंचायतचे विरोधी गटनेता आशिष कावटवार, गणेश वासलवार व इत्तर नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात मुंबई नगरविकास मंत्रालयाचे सचिव, सहआयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व इतर पदाधिकारी, अधिकाऱ्याच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
पोंभुर्णा नगर पंचायत मधील घनकचरा व्यवस्थापण प्रक्रिया बाबत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे पिटीशन क्र. ५४३१/२०२५ अन्वये घनकचरा निविदा प्रक्रियेच्या दरम्यान, जर कोणताही कार्यादेश जारी केला गेला तर तो या याचिकेच्या निकालाच्या अधीन असेल. व पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर असेल असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या सुनावणी कडे पोंभुर्णाकरांचे लक्ष लागेल आहे.