Pratibha Dhanorkar: ताडोबात वाघांच्या दर्शनासाठी मोजावे लागणार तब्बल १२ हजार ६०० रूपये!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सफारी प्रवेश शुल्क नुकतेच वाढविण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांना आता शनिवार-रविवारसाठी कोर झोनमधील १२ हजार ६०० रूपये शुल्क मोजावे लागेल. हे शुल्क तत्काळ कमी केले नाही तर १ ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन करू, असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्राद्वारे दिला आहे.


मानव-जिल्ह्यात आधीच वन्यजीव संघर्ष आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जीव गमावत असताना, त्याच जिल्ह्यातील लोकांना वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, हा दुजाभाव आहे. जिल्ह्यातील नागरिकांना ताडोबा सफारीसाठी केवळ २ हजार ७०० रूपये वाहन शुल्क व ६०० रूपये गाईड शुल्क आकारावे. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पर्यटन हंगामापूर्वी स्थानिकांसाठी शुल्क कपातीचा निर्णय लागू झाला नाही, तर १ ऑक्टोबर रोजी ताडोबात एकही जिप्सी आत जाऊ देणार नाही. नागरिकांच्या हक्कांसाठी उभारलेले हे मोठे निर्णायक आंदोलन असेल, असेही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमुद केले आहे.