पोंभुर्णा:- पोंभुर्णा भाजपा विद्यार्थी आघाडीच्या सचिव पदी शुभम प्रदीप दिवसे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार आणि भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा तसेच भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. या निवडीमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष हरीश ढवस आणि भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय मस्के यांचे मार्गदर्शन लाभले.
गेल्या अनेक वर्षांपासून शुभम दिवसे भाजप युवा मोर्चा आणि विद्यार्थी आघाडीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांच्या कामाला अधिक ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून शुभम दिवसे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
 



