चंद्रपूर:- पाऊस ओसरताच चंद्रपूर-मुल महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवले नाहीत तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असे स्पष्ट आदेश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. जनतेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणारे हे खड्डे तात्काळ भरले गेले पाहिजेत, हीच खरी लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित राहावा यासाठी मी नेहमीच आग्रही राहणार, असा ठाम निर्धार आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, चंद्रपूर-मुल रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचा निर्णय होणार असून, याठिकाणी रेल्वे ओव्हरब्रिजलाही मान्यता मिळणार असल्याचे गडकरी साहेबांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा दीर्घकाळचा प्रश्न मार्गी लागणार आहे.


