मुंबई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाही, ते मला दुश्मन मानत असतील, ज्याप्रमाणे शिवसेना संपवायला निघाले ते विसरणार नाही अशी टिका शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. या केलेल्या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना संपलेली नाही, ती फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडे 'शिफ्ट' झाली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर "शिवसेना संपवायला निघालेत" अशी टीका केली होती. या टीकेला भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना संपलेली नाही. बाळासाहेबांची विचारधारा घेऊन चाललेली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे 'शिफ्ट' झाली आहे. त्यामुळे शिवसेना संपल्याचा प्रश्नच नाही.