बल्लारपूर:- स्थानिक गोकुळनगर वॉर्डातील आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १४) सायंकाळी घडली. वेदिका राजू राजपूत असे मृत मुलीचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी वेदिकाचे वडील बाहेरगावी तर आई बाजारात गेली होती. दोघेही घरी आल्यानंतर आतून दरवाजा लावल्याचे दिसून आले. दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला असता, दुपट्याने गळफाससह वेदिका खाली कोसळलेली आढळून आली. कुटुंबीयांनी वेदिकाला तत्काळ डॉक्टरांकडे नेले असता मृत घोषित केले.
पोलिसांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येने गोकुळनगर वार्डात हळहळ व्यक्त होत आहे.