चंद्रपूर:- गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि आदिवासी संघटनांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे त्यांनी सरकार आणि प्रशासनाकडे २० हून अधिक मागण्या सादर केल्या.
आंदोलनातील मागण्या :-
१) गोंडजमाता राणी हिराई आत्राम यांचे स्मारक व पुतळा जटपुरा गेट जवळ उभारण्यात येवून चौकाला गोंडाणी हिराई आत्राम असे नामांतरण करावे.
२) क्रांतीवीर शहिद बाबुराम पुल्लेसुर शेडमाके यांचे स्मारक व पुतळा सध्याच्या गिरणार चौकात उभारुन बाबुराव शेडमाके चौक म्हणून नामांतरण करण्यात यावे.
३) चंद्रपूर येथील कारागृह इतरत्र स्थलांतरीत करून तेथील पोलीस विभागाचे निवास स्थान इमारती बांधकाम तात्काळ थांबवावे व अस्तित्वात असलेल्या पोलीस विभागाच्या इमारती नष्ट कराव्या, व ऐतिहास गोंडकालीन राजवाडा असल्याने रिकामा करुन गोंडकालीन साम्राज्याचे मुझियम संग्रहालय बनविण्यात यावे.
४) महाराष्ट्र शासनाच्या शासकीय शाळेचे खाजगीकरण करण्यात येवू नये.
५) महाराष्ट्र राज्य यांनी ८५ संवर्ग पदाची कंत्राटी व मानधन पध्दतीने पद भरती बंद करावी.
६) वन व महसुल जमिनीवरील अतिक्रमण करून वापर करीत असलेल्यांना जमीनीचे पट्टे त्वरीत वाटप करण्यांत यावे.
७) शेतकऱ्यांचे विज बिल माफ करून अतिवृष्टीमुळे पिकाची झालेली नासाळीचे त्वरीत पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
८) मा. सर्वोच्च न्यायालयीन बोगस व बनावटी आदिवासी विरोधातील तात्काळ अंमलबजावणी करुन रिक्त शासकिय पदावर खऱ्या आदिवासींची तात्काळ भरती करण्यांत यावी.
९) चंद्रपूर जिल्हयात अधिक क्षमतेची विज निर्माती होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला मासिक २०० युनिट मोफत विज व कमी दरात देण्यात यावे.
१०) चंद्रपूर जिल्हयातील असलेल्या उद्योगात चंद्रपूर जिल्हयातील जनतेला व प्रकल्प ग्रस्तांना रोजगार प्रथम प्राधान्याने देण्यात यावे.
११) शासकीय निमशासकीय आश्रम शाळा व वस्तिगृहातील व्यवस्थेत सुधारणा करण्यांत यावी.
१२) विशेष जनसुरक्षा विधेयक जनविरोधी संविधान, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र विरोधी मसुदा तरतुद असल्यामुळे त्वरीत रद्द करावे.
१३) चंद्रपूर जिल्हयातील कारखाने उद्योग यांनी शेतकऱ्यांच्या शेत जमीनी हस्तांतरीत केलेल्या प्रकल्प ग्रस्तांना त्वरित योग्य तो मोबदला देवून रोजगार उपलब्ध करून द्यावे.
१४) कारखाना लगतच्या शेतक-यांच्या शेत जमीनीचे नुकसान होणार नाही किंवा नापिकी होणार नाही यासाठी प्रभावी उपाय योजना करण्यात यावी.
१५) अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपुर येथील परिसरातील तथा कंपनीच्या लगत असलेल्या शेतकयांची शेती हस्तांतरीत करुन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा सिमेट कंपनी व्यवस्थापक हे बळजबरीने खोदकाम करीत असून ते त्वरीत थांबवावे.
१६) अनुसूचित जमातीच्या आरक्षणात इतर कोणात्याही जातीचा समावेश करु नये व बोगस आदिवासीला महाराष्ट्र शासनाने दिलेले संरक्षणाचे परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे.
१७) ५० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांना पेसा कायदा लागू करणयात यावा व पेसा कायदयाची कठोर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
१८) चांदागडचे अखेरचे गोंडराजे यादवशहा महाराज आत्राम यांचे स्मारक व पुतळा बस स्थानक चौकात उभारण्यात येवून चौकाचे नामांतरण करण्यात यावे.
१९) चंद्रपूरातील किल्यांच्या गेटला व खिडक्यांना गोंडकालीन राजाचे नांव देण्यात यावे.
२०) चंद्रपूर जिल्हयात तालुका स्तरावर व प्रत्येक गावात गोदुल इमारती (आदिवासी भवन) बांधकाम करण्यात यावे.
२१) वाघाचे हत्यामुळे शेतकरी, मजुर, गुराखी व वाटसरू यांचे संरक्षण उपाययोजना करण्यात यावे.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, त्यांनी या मागण्यांबाबत अनेक वेळा सरकारला निवेदने दिली आहेत, पण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. जर सरकारने या मागण्यांकडे त्वरित लक्ष दिले नाही, तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.