अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या संपूर्ण यादी
मुंबई:- राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस दलात भरती होण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. 15631 पदे भरली जात असून त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15631 पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत. जाणून घ्या या पदभरतीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.
आवश्यक कागदपत्रांची यादी
SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
जन्म दाखला
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
जातीचे प्रमाणपत्र
जात-वैधता प्रमाणपत्र
संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS CIT)
खेळाडू प्रमाणपत्र आणि पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती (शासन निर्णय दि. 17/03/2017, दि. 11/03/2019 आणि दि. 01/07/2025 प्रमाणे)
नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र: (वि.जा-अ, भ.ज.-ब., भ.ज-क, भ. ज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष आणि महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरीता दावा करु इच्छित असणाऱ्या महिला यांचेबाबत महिला आणि बालविकास विभागाचा शासन निर्णय दि. 04/05/2023 मधील तरतूद क्र. 4 नुसार),
माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, (जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवाराला अर्ज सादर करता येईल)
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र
पोलीस पाल्य प्रमाणपत्र
अनाथाबाबतचे प्रमाणपत्र
अंशकालीन प्रमाणपत्र
इ. डब्ल्यू. एस प्रमाणपत्र
एसईबीसी प्रमाणपत्र
NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र
पदाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या
पोलीस शिपाई - 12399
पोलीस शिपाई चालक - 234
बॅण्डस्मन - 25
सशस्त्र पोलीस शिपाई - 2393
कारागृह शिपाई - 580
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आणि वेळ - 29 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6 वाजल्यापासून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ - 30 नोव्हेंबर 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत.


