अपघात गाडीला पोंभूर्णा नेत असताना चिंतामणी कॉलेज पोंभूर्णा जवळ अचानक घेतला पेट.
पोंभुर्णा:- मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 /11/2020 बुधवारला अक्सापुर-पोंभूर्णा मार्गावर सोनापूर बस स्टँड जवळ अपघात झाल्याची घटना दहाच्या सुमारास घडली. दोन्ही गाड्या फोर व्हीलर असून, MH 34 BF 596 या गाडीचा चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहेत. स्कार्पिओ ही गाडी अशोक गुंजेकर यांच्या मालकीची आहे तर, कार ही विनोद थेरे यांच्या मालकीची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नविन फोटो व माहितीनुसार.....
अपघात गाडीला (MH 34 BF 596)पोंभूर्णा पोलीस स्टेशन मध्ये नेत असताना चिंतामणी कॉलेज पोंभूर्णा जवळ अचानक पेट घेतल्याने गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. काही काळासाठी त्या ठिकाणी ताण तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.