भैरव धनराज दिवसे स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजना पत्रकार तथा मुख्य संपादक आधार न्यूज नेटवर्क जिल्हा चंद्रपूर
चिंतामणी बहुउद्देशिय शिक्षण मंडळ, बल्लारपूर व्दारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा राष्ट्रीय सेवा योजनांचा स्वयंसेवक, पत्रकार तथा मुख्य संपादक आधार न्यूज नेटवर्क जिल्हा चंद्रपूर.
सध्याच्या काळात काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आले आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने वारंवार केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आपण घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करू या. मी घरीच थांबणार, तुम्ही पण घरीच थांबा. माझे आरोग्य, माझी जबाबदारी. मीच माझा रक्षक. कोरोना हरेल, देश जिंकेल. आपण घरात थांबून देशसेवा करू आणि देशाला वाचवू. घरातून बाहेर पडू नका प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करा.
सर्वांनी आपली आणि घरच्यांची नीट काळजी घ्यावी, वारंवार आपले हात स्वच्छ धुवावेत, सुरक्षित अंतर ठेवा, विनाकारण घरा बाहेर पडू नका, डोळे, नाक, आणि तोंडाला स्पर्श टाळा, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर आणि तोंडावर रूमाल ठेवा.
आपल्या गावातील नागरिक बाहेर राज्यात मंजुरीसाठी गेले असणार, आणि ते आता आपल्या स्वगावी परतले असेल तर त्यांनी स्वता:हुन आपल्या गावातील सरपंच, सचिव उपसरपंच, आशावर्कर यांच्या कडे जाऊन स्व:ताची माहिती द्यावी. आणि क्वारंटाईन व्हावे. स्वता:हुन प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती.
सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा. आणि त्याचा वापर करावा. त्यामध्ये विचारले प्रश्नाचे उत्तर अचूक द्यावे. आणि आपल्या घराच्यांना, आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवार हा आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करायला सांगावा.
सर्व पोलिस दल, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कामगार, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरवणारे यांच्या कार्याला माझा सलाम.
आपण गरजु नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करत आहो. पण मदत करतांना फोटो काढत आहो. पण फोटो काढणे आवश्यक आहे, अस मला तर वाटत नाही. कारण ते गरीब कुटुंब असेल पण ते भिकारी नाही आहे. म्हणुन कृपया करून कुणी पण मदत करतांना फोटो काढू नये.
लाशे उठाणे से अच्छा है
लठ ही उठालो साहब...
पिटेगा इंडिया तभी तो
घर मे टिकेगा इंडिया...
पोलिस गाडी आली की पळुन जाणे. पोलिस निघुन गेल्यावर पुन्हा रस्त्यावर येणे. हा धोका तुम्ही पोलिसांना नाहीतर स्व:ताला देत आहे.
🇮🇳🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🇮🇳