बिबट्याचे शवविच्छेदन करून पशुवैद्यकीय अधिकारी व वन्यप्राणीमित्रांच्या उपस्थितीत दहन.
Bhairav Diwase. June 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- वनपरिक्षेत्र कार्यालय सावली अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपक्षेत्रातील शिर्शि बिटात जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यु झाल्याची खळबळ जनक घटना घडली शेताची नासधुस करत असलेल्या डुकरांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी रानटी डुकरांचा शिकार करण्याचा सापळा सुरु केला आहे. अशाप्रकारचे रानडुकरांची शिकार करण्यासाठी जाळे लावण्यात आले होते.या जाळ्यात साडेतिन वर्षीय बिबट अडकून आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास मृत्युमुखी पडला. या संदर्भात सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जि.व्ही. धाडे, व्याहाड खुर्दचे क्षेत्रसहायक डब्ल्यू.एन. बुराडे, वनसहायक चौधरी व सहकारी पुढील तपास करीत आहेत.
शिर्शी बीटातील कक्ष क्र 1534 अंतर्गत साखरी माल येथे सदर घटना घडली. बिबट्याचे शवविच्छेदन करून पशुवैद्यकीय अधिकारी व वन्यप्राणीमित्रांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले.