Click Here...👇👇👇

माननीय आमदार बंटी भाऊ भांगडीया यांचेकडून शिरपूर येथील गरजूंना आर्थिक मदत.

Bhairav Diwase
श्री.राजू गोपाळा कोसे व श्री मुखरू बापूराव आदे यांना आर्थिक मदत.
Bhairav Diwase.   June 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमुर
चिमुर:- सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे समाजसेवेचे वृत्त जोपासणारे चिमूर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार माननीय श्री.बंटीभाऊ भांगडिया यांचेकडून शिरपूर येथील श्री.राजू गोपाळा कोसे हे कॅन्सरग्रस्त असून त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. व श्री मुखरू बापूराव आदे हे भरपूर दिवसापासून बिमार आहेत. आणि त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. कार्यकर्त्यांमार्फत आमदार साहेबांना लक्षात आले असता त्यांनी गरजूंना आर्थिक मदत डॉ. श्यामजी हटवादे (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा) यांच्या  नेतृत्वामध्ये श्री. विलास कोराम (माजी उपसभापती पंचायत समिती चिमूर ) श्री दिवाकरजी डहारे (बुथ अध्यक्ष शिरपूर) श्री. विलासजी बोरकर व श्री. सुनीलजी कोसे (भाजपा कार्यकर्ते) यांच्या उपस्थितीत मदत देण्यात आली.