मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त उर्जानगर जि.प.क्षेत्राच्या वतीने इयत्ता 10 वी 12 तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

Bhairav Diwase
विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन  प्रोत्साहन म्हणून प्रशस्तीपत्र, सिंहावलोकन पुस्तिका देण्यात आले.
Bhairav Diwase.    July 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- दिनांक 30 जुलै 2020 ला महाराष्ट्राचे लोकनेते, मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त उर्जानगर जि.प.क्षेत्राच्या वतीने इयत्ता 10 वी 12 तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केसरीनंद नगर हनुमान मंदिर येथे करण्यात आला.
   यावेळी एकूण 15 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन  प्रोत्साहन म्हणून प्रशस्तीपत्र, सिंहावलोकन पुस्तिका देण्यात आले.
    तसेच आ.सुधीरभाऊ यांच्या वाढदिवसनिमित्त सर्वात जास्त मार्क आलेल्या विद्यार्थ्यांच्या हाथाने केक  कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.*
      या कार्यक्रम प्रसंगी रामपालजी सिंघ यांनी विद्यार्थ्यांना उज्वल यशाच्या शुभेच्या दिल्या. व जास्तीत जास्त मेहनत घेऊन यश संपादन करावे असा सन्देश दिला.
   या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रामपालजी सिंघ, माजी जि.प.सदस्य विलासजी टेंभुर्ने,जि.प.सदस्या वनिताताई आसुटकर,पं.स.सभापती केमाताई रायपुरे,माजी जि.प.सदस्य शांताराम चौखे,नामदेवजी आसुटकर,पंचायत समिती सदस्य संजय यादव,अतुल पोहाने,मदन चिवंडे, राहुल बिसेन, दिनेश नेरकर तसेच मुलांचे आई-वडील यांची उपस्थिती होती.