देवस्थान कमेटी चा उपक्रम, जि प सदस्यांच्या उपस्थिती.
Bhairav Diwase. July 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजा धाबा येथील श्री संत कोंडय्या महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने कृषी दिनानिमित्त संस्थांच्या खाजगी शेतशिवारात जि प सदस्य चंद्रपूर तथा देवस्थान कमिटी च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज वृक्षारोपण करण्यात आले.
आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि प सदस्य वैष्णवी बोडलावार, माजी जि. प सदस्य तथा संत कोंडय्या महाराज देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती, बाबुराव बोम कंठीवार, धाबा सरपंच रोशनी अनंमुलवांर, स्वप्निल अनमुलवार, प. स. उपसभापती अरुण कोडापे, मनोज कोपावर, हिरा कंदीकुरवार, प्रकाश कावळे, विठ्ठल चनकापुरे, आशिष मामेडपल्लीवार, प्रवीण मेश्राम, पत्रकार निलेश झाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत कोंडाय्या महाराज देवस्थान कमिटीच्या शेत शिवारामध्ये ४५० टीशू कल्चर बांबू रोप व विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करून उपस्थितांना कृषी दिनाचे महत्त्व पटवून देत वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे सांगत वृक्षारोपण व त्याचे संगोपन हे मानव जातीला कितपत उपयुक्त आहेत याबद्दल मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थांचे इतर पदाधिकारी तथा गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.