आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. आ.उपकेंद्र जुनोना येथे कोरोना योध्याना सुरक्षा कीटचे वितरण.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    July 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- बल्लारपुर विधानसभेचे कर्तव्यदक्ष नेते, राज्याचे माजी अर्थ व नियोजन तथा वनमंत्री, विकासपुरुष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कोरोणा महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देत असतांना योद्धे बनून राष्ट्रीय सेवा बजावणार्‍या आरोग्य सेवक, सेविका, पोलिस पाटिल, ग्रामपंचायतचे कर्मचारी, कोतवाल सन्मान म्हणुन चंद्रपुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जुनोना येथे सेवा देत असणार्‍या आशा वर्कर यांना सुरक्षा कीटचे वितरण केले.

याप्रसंगी त्यांसमवेत, अमोल जगताप, अशोक बैरागी, अजय वाढ़ाई, राजू भोयर,   वैद्यकीय अधिकारी ,आशा वर्कर्स आणि प्रा. आ. उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.