राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाज कंटकावर तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची प्रहार संघटनेने केली मागणी.
Bhairav Diwase. July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावलीसावली:- संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेले देशाचे घटनाकार भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करून त्याला वाचा फोडण्याचे आणि त्यातच दलितांवर होणाऱ्या जाचक आणि गुलामीच्या पाशातून त्यांना मुक्त करून त्यांना संविधानात कायद्याच्या चौकटीत आणून एका समान दर्जात आणण्याचे कार्य केले . परंतु अशा महान व्यक्तीच्या ज्यांची गणना देशाच्या प्रथम विद्वानांमध्ये केली जाते अशा महाविद्वान पुरुषांच्या संग्रहित वस्तू असलेल्या राजगृहावर काही दूषित मनाच्या समाजकंटकांनी भ्याड हल्ला करून ऐतिहासिक वस्तूंची नासधूस केली .
सविस्तर वृत्त याप्रमाणे की , मुंबई स्थित असलेली देशाची अनमोल अशी ऐतिहासिक वास्तू राजगृहावर मंगळवार दिनांक ७/०७/२०२० रोजी रात्रोला एका माथेफिरू व्यक्तीने राजगृहाच्या बाहेरून एकापाठोपाठ एक असे दहा दगड राजगृहाच्या दिशेने भिरकावले असता यातच शांत न होता राजगृहाच्या आत येत आतील परिसरातील कुंड्यांची नासधूस करून राजगृहाच्या खिडकीच्या काचांची तोडफोड केली . त्यामुळे या घटनेचा निषेध सावली तालुक्यातील गावपरिसरात केल्या जात असून प्रहार संघटना सावली यांनी या घटनेची शोकांतीकेने निंदा करत निषेध व्यक्त करून आज दिनांक ९/०७/२०२० रोजी गुरुवारला मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय सावली यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करण्याचे मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सावली तालुका प्रहार संघटनेचे सेवक मा.प्रफुल तुम्मे, प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार,मा. ऍड.लाडे साहेब, प्रहार सेवक मिथुन मेश्राम, प्रहार सेवक मा.सुरेश कन्नमवार आदी उपस्थित होते.