Top News

बिबी येथील त्या रेशन धारकांना तातडीने लाभ द्यावासामाजिक कार्यकर्ते हबीब शेख यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी.

हबीब शेख यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बीबी येथील त्या सात रेशन कार्डधारकांना मिळणार न्याय.
Bhairav Diwase.    July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरोना काळात अन्नधान्याची मोठी गरज निर्माण झाली. कोरपना तालुक्यातील बिबी या गावातील ७ रेशनकार्ड धारकांची नावे दुसऱ्या गावात वर्ग झाली आहे. ऑनलाईन डाटा एंट्री करत असताना काही लोकांची नावे चुकीने दुसऱ्या गावात गेली असावी. ज्या लोकांना आधी मूळ गावात रेशन मिळत होते आणि आता त्यांचे नाव दुसऱ्या गावात वर्ग झाले असतील त्यांनी तालुका पुरवठा निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका प्रशासनाने केले.

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते हबीब शेख यांनी तहसीलदार व तालुका पुरवठा निरीक्षक यांना बीबी गावातील त्या सात रेशन कार्ड धारकांची माहिती दिली. ही माहिती लक्षात येताच तातडीने तालुका प्रशासन योग्य ती कार्यवाही करून पुढच्या महिन्यात मूळ गावात या रेशनकार्डधारकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती तालुका पुरवठा निरीक्षक भंडारवार यांनी दिली.

ऑनलाइन एन्ट्री मध्ये झालेल्या प्रशासकीय चुकीची दुरुस्ती लवकरच करण्यात येणार आहे. बिबी या गावात महालक्ष्मी महिला बचत गटाचे रेशन दुकान अनियमितता व घोळ आढळून आल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बंद केले आहे. आता बीबी येथे एका बचत गटामार्फत रेशन वितरण होत आहे. या नव्याने आलेल्या रेशन दुकानामार्फत शासकीय नियमांचे पालन करून योग्य वितरण होत असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान ज्या सात लोकांची नावे दुसऱ्या गावात वर्ग झाली त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी करत महालक्ष्मी बचत गटाच्या विरोधात तक्रार तक्रार देणाऱ्या लोकांमुळे ही सात नावे दुसरीकडे वर्ग झाल्याचा खोटा दावा करण्यात येत होता. मात्र तालुका प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हा दावा खोटा ठरला आहे.आता हबीब शेख यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बीबी येथील त्या सात रेशन कार्डधारकांना न्याय मिळणार आहे.

यावेळी तहसील कार्यालयात संतोष उपरे भारत आत्राम, सुनील भोयर, स्वप्नील झुरमुरे, राजेश खनके आदी लोक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने