Top News

चंद्रपूर जिल्ह्यात आज एकाच दिवशी १४ कोरोना बाधित.

चंद्रपूर बाधितांची संख्या १४८ वर, भद्रावती शहर ५ जण, ब्रम्हपुरी तालुका ३ जण, गडचांदूर ३ जण, जानाळात दोघे, बेंबाळ येथे एक पॉझिटीव्ह, आतापर्यत ८० कोरोनातून बरे ६८ बाधितांवर उपचार सुरू
Bhairav Diwase.    July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक ९ जुलै रोजी आरोग्य विभागाकडून आलेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच दिवशी १४ बाधित पुढे आले आहेत. कालपर्यंत जिल्ह्यामध्ये १३४ पॉझिटीव्ह आढळले होते. आज त्यामध्ये १४ बाधिताची भर पडल्याने एकूण संख्या १४८ झाली आहे. आतापर्यंत ८० नागरिक कोरोना मुक्त झाले असून सध्या ६८ नागरिक जिल्हयात उपचार घेत आहेत. १४८ संख्येमध्ये चंद्रपूर शहरात निदान झालेले अन्य जिल्हयातील ४ बाधित आहेत. हे चारही बाधित राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.

ब्रम्हपुरी येथील बाधितांची संख्या रोज वाढत आहे. गुरुवारी ब्रह्मपुरी शहरातील भवानी वार्ड येथील एक, तालुक्यातील खेड व बेटाळा या दोन गावातील प्रत्येकी एका पॉझिटिव्हचा समावेश आहे. तालुक्यातील आजची पॉझिटीव्ह संख्या तीन झाली आहे.

तर मूल तालुक्यातील बेंबाळ येथील हैदराबाद येथून आलेला नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे. मुल तालुक्यातीलच जानाळा येथूनही संपर्कातून पॉझिटिव्ह झालेल्या दोन नागरिकांचा समावेश आहे.

भद्रावती शहरातील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून शहरात सतत संख्या वाढत आहे.

गडचांदूर येथे देखील संपर्कातील ३ पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.

त्यामुळे सायंकाळपर्यंत जानाळा ( एकूण २), गडचांदूर ( एकूण ३ ) भद्रावती ( एकूण ५ ) बेंबाळ ( एक ) ब्रम्हपुरी तालुका ( एकूण ३ ) अशा प्रकारे एकाच दिवशी १४ पॉझिटीव्ह पुढे आले आहेत. या सर्व कोरोना संक्रमित नागरिकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने