Top News

गडचांदूर येथील प्रा.सचिन भसारकर यांना गोंडवाना विद्यापीठाची पी. एच. डी.पदवी बहाल.

आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, पत्नी आणि त्यांचे  मित्र रुपेश उपाध्ये, महेश आमणे, मारोती जुमनाके यांना दिले.
Bhairav Diwase.    July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर, तह.कोरपना,जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी व सध्या जिजामाता शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार येथे भूगोल विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा.सचिन पुंडलिक भसारकर यांना गोंडवाना विद्यापीठाची पी. एच. डी.पदवी बहाल करण्यात आली. त्यांनी नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील डॉ. डी. ए. पारधी सर यांच्या मार्गदर्शनाखाली  "चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषण समस्येवर भूमी पोषण क्षमतेचा होणाऱ्या प्रभावाचे तौलनिक अध्ययन" या विषयावर संशोधन केले त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, पत्नी आणि त्यांचे  मित्र रुपेश उपाध्ये, महेश आमणे, मारोती जुमनाके यांना दिले आहे. सर्व सामाजिक स्तरातून प्रा.सचिन भसारकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने