Top News

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली दौऱ्यावर.

11 जुलै रोजी सिंदेवाही, ब्रम्हपुरी येथे बैठक.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे 11 जुलै ते 14 जुलै दरम्यान नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीचा दौरा करणार आहेत.

11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाजता तहसील कार्यालय, सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे आगमन होऊन, कोविड-19 बाबत आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय,  सिंदेवाही येथे दुपारी 2 ते 2:30 राखीव असणार आहेत. दुपारी 2:30 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे दुपारी 3:15 वाजता आगमन होऊन कोविड -19 संदर्भात आढावा बैठकीस उपस्थित असणार आहेत. सायंकाळी 4:15 ते 6:15 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे राखीव असणार आहेत. ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून सायंकाळी 6:30 वाजता गडचिरोली कडे प्रयाण करतील. शासकीय विश्रामगृह, रानफूल निवास पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सायंकाळी 7:30 आगमन व मुक्काम करतील.

दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 1 वाजता गडचिरोली येथून सावली, जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील त्यानंतर तहसील कार्यालय सावली, जिल्हा चंद्रपूर येथे दुपारी 1:30 आगमन व कोविड-19 बाबत आढावा बैठकीस उपस्थिती असणार आहे. दुपारी 2:30 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, सिंचन विभाग, सावली येथे राखीव असतील. सावली, जिल्हा चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे सायंकाळी 5:30 वाजता प्रायाण करतील व रानफूल निवास, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सायंकाळी 6 वाजता आगमन व मुक्काम करतील.

दिनांक 13 जुलै सोमवारी रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कोविड-19 बाबत बैठक घेणार आहेत. तर 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे विकास कामाचा आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर गडचिरोली वरून नागपूरकडे दुपारी 2 वाजता प्रयाण करुन कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथे सायंकाळी 4 वाजता आगमन राखीव व मुक्काम असणार आहे.

14 जुलै मंगळवार रोजी सकाळी 7:30 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण करतील. सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन तसेच 08:40 वाजता  विमानाने नागपुर वरून मुंबईकडे प्रयाण करतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने