Top News

मायक्रो फायनॉस कंपन्याकडून खेडयातील महीलांची आर्थिक लुट.

७२०रू .किस्तचा ७००रू व्याज ,
ग्रामीन कुटा कंपनीचा प्रताप.
Bhairav Diwase.    July 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- ग्रामीण भागात सक्रीय असलेल्या मायक्रो फायनॉन्स कंपन्यांकडून अक्षरक्षः ग्रामीण महीला वर्गाची ग्रुप लोन व इतर लोनच्या माध्यमातून अतोनात व्याजदर लावून आर्थिक लुट चालू असल्याचा प्रकार भिसी शंकरपूर रोडवर असलेल्या पुयारदंड गावात उघडकीस आला.
        संपुर्ण जग कोरोणाच्या संकटात सापडले असता यामुळे प्रत्येक देशाची सामाजिक , राजकीय , वैद्यकीय , आर्थिक , परिस्थिती बिघडली असून देश संकटात सापडलेला आहे . या सर्व संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या भारत सरकारने केंद व राज्य सरकारने आपापल्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न केले.
       केद्र सरकारने संपुर्ण देशात वेळोवेळी जनतेला मतात घेवून लॉक डाऊन घोषीत केले .१४४ कलम लागू करू०ा जनतेला कोरोणा संकटाला हरविण्यासाठी घरातच रहा अशी सक्ती केली .
३ते ४ महीने घरातच बसलेल्या जनतेचा विचार करून केन्द्र सरकारने जनधन खात्यामधे महीला ना प्रत्येकी ५०० रू ३ महिन्यासाठी जमा केले ' व्यापारी वर्गाला कोविड-१९ सहाय्यता निधी पुरविला गेला. कर्जाच्या व्याजाची रककम परत केली गेली . शेतकऱ्याची काही प्रमाणात कर्ज माफ केली गेली व किसान कोविड सहाय्यता निधी पुरविली जात आहे . किसान सन्मान  योजनेअंतर्गत शेतकऱ्याला २००० रू प्रमाणे मदत केली . संपुर्ण देशात मोफत अन्नधान्य वाटपाची योजना राबविली गेली . महीला भगिनींना उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस भरणा करूण दिला . अशा प्रकारे अणेक वेगवेगळ्या सुविधा सरकारकडून निशुल्क पुरविण्यात आल्या .
याला अपवाद ग्रामीण भागात सक्रीय असलेल्या मायक्रो फायनान्स कंप०या . यांनी लॉक डाऊन पिरेड लागताच महीला गटाकडून लोनच्या  किस्त वसूल केल्या नाही परतू जशी लॉक डाऊनमधे सिथिलता देण्यात आली तशाच ह्या कंप०या गावागावात गटाच्या मिटिंग लावून    महीला कडून कोरोणा| पिरेड मधील बाकी किस्त व उर्वरीत लोनच्या बाकी असलेल्या रकमेवर व्याज चढवून किस्त वसूल करू लागल्या आहेत .
अगोदरच या कंपन्या लोनची किस्त मुद्दल रक्कमेवर त्या ठराविक पिरेडचा व्याज लावूनच किस्त पाडून देतात व गटातील महीला मेम्बर दर आठवडी  किंवा पंधरवाडी किंवा मासिक किस्तीनुसार भरतात .
               परंतू  ग्रामीण कुटा कंपनीच्या पवणी शाखेकडून लौक डाऊनच्या पिरेडमध्ये पुयारदंड येथील महीला मेंबरकडून ७२०रूच्या किस्तीवर ७०० . ५८२ ,   ४८२ ,३१० अशा प्रकारचे वेगवेगळी व्याजाची रक्कम वसुल केली .
ही कमी जास्त किस्त कशी असे महीला नी विचारले असता कोरोनाच्या पिरेडमध्ये तुमची काही किस्त बाकी होत्या . त्यामुळे तुम्हाला किस्तीचा नवीन ट्रॅक बनवून दिला आहे . त्यामुळे ही किस्त कमी जास्त आहे . अशी माहीती केंद्र प्रमुख शंशाक वाढई यांनी महीला मेम्बरला दिली.
परंतू दुसऱ्या हप्त्यात केंदप्रमुख किस न्यायला आले असता काहींनी विचारले असता तो व्याज आहे असे माहीत पडले . या संदर्भात संबधीत शाखा प्रंबधकाशी बोलले असता तुम्ही किस्त जर भरली नाही तर व्याजावर व्याज लागेल अशी माहीती मिळाली . यामुळे महीला मेंबराना व्याजाचा चांगलाच धकका बसला . अशा प्रकारे मुददल व्याज  व्याज अशा चक्रव्याज महीलाकडून वसूल केल्या जात आहे.
           कोरोनामुळे आधीच महीला ना व इतर मजूर वर्गाला आपल्या हातच्या कामाला मुकावे लागले व त्यात ७२० रु . च्या किसीवर ३ मही०याचे  ७००रू .०याज व ७००रू. किसीवर १५ दिवसाचे ३२१रू .०याज  हे महीला कडून वसुल करण्याचा प्रकार ग्रामीण कुटा शाखा पवणीच्या वतीने होत आहे . व अशा प्रकारची आर्थिक लुट ग्रामीण भागात चालू आहे .आम्ही आमची रेग्युलर किस्त ७२०रू नियमित पणे भरण्यास तयार आहोत पण हा अतिरिक्त व्याज भरणार नाही. असा निर्णय पुयार दंड येयील महीला मेम्बरानी घेतला आहे .
थोडे नवीन जरा जुने