नागभीड पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदी सौ.रेखाताई कारेकर यांची नियुक्ती.

चंद्रपूर जिल्हा परिषद च्या उपाध्यक्षा  तथा सभापती शिक्षण,क्रीडा आरोग्य समिती सौ.रेखाताई कारेकर यांचेकडे प्रभार सोपविण्यात आला.
Bhairav Diwase.    July 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
नागभीड:- नागभीड पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रणया गड्डमवार व उपसभापती अरविंद देशमुख यांचे विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे तेथील सभापती व उपसभापती एकाच वेळी रिक्त झाले आहे  त्यामुळे तेथील पुढील निवडणूक होईपर्यंत प्रभारी सभापती म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद च्या उपाध्यक्षा  तथा सभापती शिक्षण,क्रीडा आरोग्य समिती सौ.रेखाताई कारेकर यांचेकडे प्रभार सोपविण्यात आलेला आहे. नागभीड पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदी नियुक्ती झाल्याने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया व समस्त भाजपा पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने