Top News

युती उमेदवारांच्या विजयात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे योगदान नाही: - सुधीर मुनगंटीवार

२०१४ मध्ये भाजपा आणि शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. याकडे पवारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले,” असे मुनगंटीवार म्हणाले.
Bhairav Diwase.    July 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान पवारांनी “भाजपचे 105 आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेनासोबत नसती तर 105 चा आकडा 40-50 असता,” असे वक्तव्य केले होतं.

यावर आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आली प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेना-भाजप युतीच्या विजयी उमेदवारांच्या यशात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वाटा होता. मात्र युती उमेदवारांच्या विजयात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे योगदान नाही,” अशी टीका राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच “शिवसेनेचे आमदार पवारांमुळे कसे निवडून आले याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी द्यावं,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले.

२०१४ मध्ये भाजपा आणि शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. याकडे पवारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले,” असे मुनगंटीवार म्हणाले.

“भाजप आणि शिवसेनेचे विचार समान नव्हते हे शरद पवार यांचे विधान आश्चर्यजनक आहे. गेली 30 वर्षे आम्ही सोबत होतो. समान तत्त्वावर निवडणुकाही लढवल्या आहेत. मात्र 194 दिवसातच शिवसेना आणि काँग्रेसचे विचार एक झाले याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्वाचा विचार भाजपशी विसंगत होता का? असा सवालही उपस्थितीत केला. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत का?” असाही सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

“राजकारणातील कुणीही दर्प करू नये अशी भाजपची भूमिका आहे. सत्ता आली की माजायचे नाही आणि विरोधी पक्षात गेले की लाजायचे नाही अशीच ही भूमिका आहे. फडणवीसांच्या एका वाक्यावरुन त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण केले गेले. मात्र आम्ही शंभर टक्के समाजकारण करतो,” असेही मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने