मुल हादरले… पुन्हा एकाच दिवशी १३ पॉझिटिव्ह.

Bhairav Diwase
१२ मजूरांसह मूल शहरातील आणखी एक युवकांचा कोरोणा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह.
Bhairav Diwase.    July 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल शहरात कोरोणाचा कहर कायम असून, बाहेर राज्यातून स्थलांतरीत झालेल्या मजूरांपैकी आणखी १२ मजूरांसह मूल शहरातील आणखी  एकाचा कोरोणा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यांने, शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

विश्वसनीय सुत्रानी दिलेल्या माहीतीनुसार, यापूर्वी आढळून आलेल्या १३ मजूरांसोबतच आलेल्यापैकीचे काहीचे अहवाल काल रात्रौ उशीरा तालुका आरोग्य प्रशासनास प्राप्त झाले.  त्यात, १२ मजूरांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असून, कर्मवीर महाविदयातील कॉरन्टाईन सेंटर मध्ये असलेल्या एका युवकांचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. 

आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान तालुका प्रशासनाने सर्व कोरोनाग्रस्तांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रवाना केले आहे.


आधी अतिशय सेफ मध्ये असलेले मुल शहरात अचानक कोरोणाचा कहर झाल्यांने, मुल शहर हादरून गेले आहे.  व्हाट्सअप आणि इतर सोशल मिडीयावर वेगवेगळया प्रतिक्रिया उमटत आहे.  नागरीक आपले म्हणणे मांडत आहेत.  याबाबत मूलच्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनीही मूल शहरातील जनतेला आवाहन करणारे पोष्ट सोशल मिडीयावर वायरल केले आहे.

नम्र आवाहन

 सर्व मुलवासीय जनतेला विनम्र आवाहनकरण्यात येते की मूल शहरात पर राज्यातूनआणलेल्या मजुरांपैकी बरेच बाधीत रूग्णमिळाल्याने साहजिक आहे की, स्थानिक लोकांनाराग येणे व तो राग व्यक्त करणे. पण एवढा सारामजूरवर्ग आणतांना मूल शहरातील विलगिकरणकक्षाची क्षमता तपासली का? मजूर आणतअसतांना स्थानिक स्वराज्य संस्था यांना ही माहितीदिली का? हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.आता कुठेमाझ्या मूल शहराने स्वतःला भितीतून सावरले होते,पण ह्या दोन दिवसात बाहेरील मजूराच्यासहकोरोणाने शिरकाव केला. आणी परत एकदामूलवासीय माझ्या बंधूभगीनींना भीतीचा सामनाकरावा लागतो आहे. पण माझ्या बंधू आणीभगनिंनो आपल्या आरोग्यासाठी नगरप्रशासन,तहसिल प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभागयोग्य काळजी घेत आहे तरी आपन सहकार्य करावेही विनंती.                                                                        धन्यवाद                          
   प्रा.रत्नमाला भोयर, नगराध्यक्षा न.प.मुल