केरोडा येथे शेत शिवारात विज पडून महिलेचा मृत्यु.

Bhairav Diwase
मृतक महिलेच्या परिवार ला आर्थिक मदत करण्याची मागणी दिनेश पा चिटनुरवार व केरोडा नागरिकांची केली.
Bhairav Diwase.    July 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील केरोडा येथे काल दि.१९ जुलै ला सायंकाळ च्या सुमारास अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली तसेच विजेचा प्रचंड गडगडाट झाला आणि त्याच वेळी विज ही विद्या राजेंद्र वालदे वय ४० वर्ष रा.केरोडा यांचा अंगावर विज पडल्याने मृत्यु झाला.
         शेतात रोवनीचे काम चालू असल्याने विद्या व सोबत चार जन विजेचा गडगडाट पाहून शेतीची कामे आटपुन शेतच्या बाहेर येताच अचानक विज पडल्याने विद्याचा जागीच मृत्यु झाला तर सोबत असणाऱ्या एक महिला व पुरूष अशा दोघांना शाक बसल्यासारखे झाले.

          सदर घटनेची माहिती कांग्रेस नेते दिनेश पा. चिटनुरवार यांनी तहसिलदार सावली व ठानेदार पोलीस स्टेशन सावली यांना फोन करून माहिती दिली. संबंधित अधिकारी यांनी घटनास्थळ गाठले. व अधिकारी यांनी भेट देवून पंचनामा केले आहे. मृतक महिलेच्या परिवार ला आर्थिक मदत करण्याची मागणी दिनेश पा चिटनुरवार व केरोडा नागरिकांची केली आहे.