पिडीत महीला व बालकांच्या मदतीकरीता स्थापित केलेल्या भरोसा सेलचे उदघाटन.

ना. विजय वडेट़टीवार,मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुर्नवसन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे शुभ हस्ते.
Bhairav Diwase.    July 28, 2020(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
दिनांक 27-07-2020 रोजी मा. ना. विजय वडेट़टीवार,मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुर्नवसन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे शुभ हस्ते पिडीत महीला व बालकांच्या मदतीकरीता स्थापित केलेल्या भरोसा सेलचे उदघाटन करण्यात आले. जिल्हयातील अन्यायग्रस्त महीलांसाठी त्वरीत मानसिक व कायदेशीर मदत व सल्ला देण्याची सोय असलेल्या स्वतंत्र कक्षाची निर्मीती करण्यात आली असुन सदर ठिकाणी महीलांच्या विरुध्द असलेल्या सर्व प्रकारच्या हिसांचाराविरुध्द लढण्यासाठी एका छताखाली वैदयकीय, कायदेशीर, मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सहाय्यासह तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यावेळी सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी चंद्रपुर डॉ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ.महेश्वर रेड़डी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपुर श्री.राहुल कार्डीले,पोलीस उपअधीक्षक(गृह) श्री.शेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधीकारी चंद्रपुर श्री.शिलवंत नांदेडकर तसेच पोलीस अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत