Top News

माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनानिमित्त जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून सावली तालुक्यातील आशा वर्कर्सना अन्नधान्याच्या कीटचे वितरण.

कोरोणा योद्धे म्हणून सेवा देणार्‍या आशा भगिनींचा भारतीय जनता पार्टी सावली तर्फे सत्कार.
Bhairav Diwase.    July 28, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज सावली शहरात भारतीय जनता पार्टी सावली यांचेवतीने आशा वर्कर यांनी टाळेबंदी काळात राष्ट्रीय सेवा बजावत दिलेल्या सेवेचे गौरव करत त्यांना प्रमाणपत्र व शील्ड देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले. यासोबतचं जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी उपस्थित आशा भगिनींना अन्नधान्याच्या कीटचे वितरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 
याप्रसंगी, मा. आ. प्रा. अतुलभाऊ देशकर यांचेहस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी  आ. अतुलभाऊंना दिर्घायुष्याच्या सदिच्छा देत भाषणातून आपले मत व्यक्त केले. यामध्ये बोलतांना, आदरणीय अतुलभाऊ म्हणजे शांत आणि संयमाने कार्य करणारे नेतृत्व आहेत. पद असो किंवा नसो परंतु सर्वसामान्य जनतेच्या सदैव संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नासाठी नेहमी अतुलभाऊ झटत असतात. पक्षकार्यामध्ये आम्हाला 
मार्गदर्शन असो किंवा सहकार्य अतुलभाऊ यामध्ये नेहमी अग्रणी असतात. असे नम्र, अभ्यासू आणि अजातशत्रु व्यक्तिमत्व आम्हाला लाभले यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी केले. यासोबतचं पुढे बोलतांना, कोरोणा सारख्या वैश्विक महामारीत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आशा वर्कर्संनी अल्पशा मानधनातही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेत उत्तम कार्य केले आहे. आणि आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य केले, याबद्दल आम्ही या भगिनींचे ऋणी आहोत. हे कार्य बजावताना आशांनी आपल्या परिवाराची काळजी न करता कार्य केले. त्यामुळे त्या आज खर्‍या अर्थाने गौरवास पात्र आहेत. असे त्या म्हणाल्या. 
यावेळी मंचावर, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष हरीशभैय्या शर्मा, जिल्हा महामंत्री तथा जि. प. सदस्य संजय गजपुरे, प्रा. गणवीर सर, माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, जि. प. सदस्या सौ. योगीताताई डबले, सौ. मनिषाताई चिमुरकर, पं. स. उपसभापती रविन्द्र बोलिवार, देवराव मुद्दमवार, प्रकाश गड्डमवार, प्रकाश खजांची, गणपत कोठारे, विनोद धोटे, सतीश बोम्मावार, दिलीप ठिकरे, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, दौलत भोपये, सौ. पुष्पाताई शेरकी, सौ. मानसी लाटेरवार, सौ. प्रतिभा बैबाटे, रनधिर दुपारे, राकेश वीरमलवार, राकेश कोंडबत्तूनवार, राहुल लोडेल्लीवार, मयूर गुरनुले, आशिष संतोषवार, हरिष जक्कुलवार, मयुर व्यास, आदर्श कुडकेलवार, आदित्य मुप्पावार यांसह आशा भगिनी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने